अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर शहराच्या पाणीपुरवठ्यात अमुलाग्र बदल घडवणारी अमृत पाणी योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुळ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर शहराच्या पाणीपुरवठ्यात अमुलाग्र बदल घडवणारी अमृत पाणी योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुळा धरणापासून वसंत टेकडीपर्यंतच्या योजनेच्या पाईपलाईनला कोणतेही पाणी कनेशन द्यायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय मनपाच्या नऊ मे रोजी होणार्या महासभेत होणार आहे. पण या पाणी योजनेवर तपोवन रोडसाठी एक कनेशन द्यावेच लागणार, अशी आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी घेतली आहे. कनेशनसाठी उपोषणाची तयारी त्यांनी दाखवल्याने अखेर मनपा प्रशासनाने पुरवणी अजेंड्याद्वारे त्यांची ही मागणी महासभेपुढे ठेवण्यास मान्यता दिली.
सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार असून त्यासाठीच्या चौथर्याच्या कामाची निविदा अंतिम मंजुरीसाठी स्थायी समिती समोर सादर झाली. सुमारे २९ लाखांच्या या खर्चास स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी मान्यता दिली. हा विषय मंजूर होण्याआधी शहराच्या पाणीपुरवठावर चर्चा झाली. त्यावेळी अमृत पाणी योजनेच्या मुख्य पाईप लाईनमधून तपोवन रोडसाठी एक कनेशन देण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली. ते म्हणाले, अमृत पाणी योजनेची पाईपलाईन विळद जलशुद्धीकरण केंद्रापासून वसंत टेकडीपर्यंत आणताना, ती आधी एमआयडीसी रोडवरील शेंडी बायपास रोडने औरंगाबाद रोडने वसंत टेकडीपर्यंत नेली जाणार होती.
१९ फुटाचा होणार चौथारा
सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा १२ फूट उंचीचा असून त्याच्या दीडपट उंचीचा म्हणजे अठरा फूट उंच व १९ फूट रुंद आकाराचा चौथरा येथे सुमारे २९ लाख रुपये खर्च करून उभरण्यात येणार आहे. किल्ल्याच्या बुरुजाचा लुक या चौथर्याला दिला जाणार आहे. त्याच्या भोवती दोन्ही बाजूला प्रत्येकी २७ फूट भागात त्रिकोणी आकारात बगीचा केला जाणार आहे. पुतळा व चौथर्याच्या उभारणीस पोलीस विभाग व राज्याच्या मुख्य आर्किटेचर यांची परवानगी मिळाली आहे. पुतळा उभारणीच्या कामास नगरविकास विभागाची परवानगी येणे बाकी आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती यावेळी स्थायी समिती समोर देण्यात आली.
त्यावेळी ती आग्रहाने बदलून तपोवन रोडने आम्ही घ्यायला लावली. त्यानंतर तपोवन रोडने ही लाईन जशी जाईल त्या पद्धतीने परिसरातील विविध कॉलनी व नागरी वस्त्यांमध्ये अंतर्गत पाईपलाईनचे जाळे निर्माण केले आहे. या पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने आम्हाला दिले आहे. त्यामुळे आता या पाईप लाईनवर कनेशन देणार नाही, असे प्रशासन कसे म्हणू शकते? या भागाशी ज्या नगरसेवकांचा संबंध नाही, त्यांच्या पत्रावर प्रशासन कनेशन देणार नसल्याचे म्हणत असेल, तर ते कसे घ्यायचे, हे आम्हाला माहीत आहे. प्रशासनाने लेखी पत्राद्वारे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
परिसरातील नागरिकांना अमृत योजनेतून पाणी मिळेल अशी आशा आहे. मात्र नगर शहरातील काही नगरसेवकांच्या मागणीमुळे अमृत पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाइनला कुठेही कनेशन द्यायचे नाही, असा निर्णय घेण्यासाठी महासभेत विषय ठेवला आहे. यामुळे तपोवन रोड परिसरातील नागरिकांवर अन्याय होणार आहे. अमृत योजनेच्या मुळा धरणापासून अहमदनगर महापालिका हद्दीपर्यंतच्या पाईप लाईनवर कोठेही व कोणालाही कनेशन देऊ नका, पण मनपा हद्दीत लाईन आल्यावर शहरवासीयांना जिथे गरज आहे, तेथे कनेशन दिले पाहिजे. अन्य कोठे कनेशन द्या अथवा नका देऊ, पण तपोवन रोडच्या नागरिकांसाठी मी कनेशन घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी उपोषण, आंदोलनाचाही निर्णयही जाहीर केला. अखेर उपायुक्त यशवंत डांगे यांनी पुरवणी अजेंडा या संदर्भात तयार करून तो महासभेपुढे सादर केला जाईल व महासभा त्यावर अंतिम निर्णय घेईल, असे स्पष्ट केले
COMMENTS