पारनेर | नगर सह्याद्री मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या दहा महिन्यांमध्ये मतदारसंघासह राज्यातील विविध जिल्हयातील गरजू रूग्णांना आमदार नील...
पारनेर | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या दहा महिन्यांमध्ये मतदारसंघासह राज्यातील विविध जिल्हयातील गरजू रूग्णांना आमदार नीलेश लंके यांनी ५० लाख रूपयांची मदत मिळवून दिली आहे. राज्यातील २८८ आमदारांमध्ये आ. निलेश लंके हे अशी मदत मिळवून देण्यात अव्वल ठरले आहेत.
गेल्या दहा महिन्यांच्या कालवधीमध्ये मुख्यमंत्री सहाययता निधीमधून राज्यातील आठ हजारांहून अधिक रूग्णांना ६० कोटी ४८ लाख रूपयांची मदत करण्यात आली असून त्यापैकी ५० लाख रूपयांची मदत एकट्या आ. नीलेश लंके यांनी विविध रूग्णांना मिळवून देत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहीती दिली.
गरजूंना मदत मिळवून देण्यात राज्यात आ.निलेश लंके नंबर वन
पैशांअभावी एखाद्या रूग्णावरील उपचार थांबू नयेत यासाठी आपण सदैव दक्ष असतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अथवा इतर सेवा भावी संंस्थांकडून मदत मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करताना अडचण निर्माण होउ नये यासाठी आपण आपल्या संपर्क कार्यालयात या कामासाठी स्वतंत्र कर्मचार्याची मंत्रालयात नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच इतर सेवा भावी संस्थांच्या नियमित संपर्कात असतो. त्यामुळे मोठया प्रमाणावर मदत मिळवून देणे मला शय होते. -नीलेश लंके, आमदार
राज्यातील दारिद्रय रेषेखालील रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ६० टक्क्यांपर्यंत मदत केली जाते. आमदार लंके हे राज्यभर दौरे करीत असताना त्यांच्याकडे अनेक रूग्णांचे नातेवाईक वैद्यकिय खर्चासाठी मदत मिळवून देण्याची मागणी करतात. आ. लंके हे अशा प्रत्येक व्यक्तीची दखल घेऊन मुख्यमंत्री सहाययता निधीबरोबरच इतर सेवाभावी संस्थांकडूनही मदत मिळवून देत असतात.
आजवर त्यांच्या विधानसभा सदस्यपदाच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो रूग्णांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळात आ. लंके यांनी केलेल्या अव्दितीय कामगिरीमुळे त्यांची वेगळी प्रतिमा राज्यात, देशात निर्माण झालेली आहे. त्यामुळे रूग्णांचे नातलग आ. लंके यांच्याशी संपर्क करतात व आ. लंकेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शय होईल तितकी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
COMMENTS