मुंबई। नगर सहयाद्री - बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. नेहमीच काही तरी वेगळ्या चित्रपटांच्या शोधात राहिलेल्य...
मुंबई। नगर सहयाद्री -
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. नेहमीच काही तरी वेगळ्या चित्रपटांच्या शोधात राहिलेल्या करणने आज त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ङ्गरॉकी और रानी की प्रेम कहानीफ चा आज निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसत असून यांची क्यूट लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
अनेक उत्कृष्ट चित्रपट निर्माते करण जोहर यांचा आज वाढदिवस आहे. सोबतच त्याच्या सिनेकारकिर्दिला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज चित्रपटाच्या निर्मात्यांसह सेलिब्रिटींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट असून चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच हसवून हसवून रडवेल अशी निर्मात्यांची प्रतिक्रिया आहे.
रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या लूकबद्दल बोलायचे तर, सध्या रणवीरच्या लूकची बरीच चर्चा सुरू असून पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या. नेहमीप्रमाणे काहींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे तर, काहींनी त्याला ट्रोल देखील केले आहे. सोबतच अनेकांनी चित्रपटाची कथा काय आहे, याचा अंदाजही लावला. एका चाहत्याने लिहिले, मरणवीर स्वत:चा लूक खेळत आहे.फ तर एकाने लिहिले की, महा छपरी लुक आहे.फ एका यूजरने तर मये निब्बा निब्बी की लव्हस्टोरी लग रही हैफ असे म्हटले आहे.
COMMENTS