पुणे। नगर सहयाद्री - पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माज...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. किशोर आवारे यांनी सर्वांसमोर बापाच्या कानाखाली लगावल्याने बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे समोर आलं आहे.
नगरपरिषद कार्यालासमोरच काल ही धक्कादायक घटना घडली होती. मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांची काल दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले होते.
काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली.
माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदल्याच्या भावनेतून ही हत्या घडवून आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक खळदे यांचा मुलगा गौरव खळदेला अटक केली आहे.गौरव खळदे हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आलं आहे.
COMMENTS