निघोज | नगर सह्याद्री महसूल आपल्या दारी या उपक्रमाने सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार असून राज्याचे महसूल मंत्र...
निघोज | नगर सह्याद्री
महसूल आपल्या दारी या उपक्रमाने सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार असून राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला पाठबळ देउन विकास साधण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन युवा नेते व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे ज्येष्ठ सहकारी राहुल शिंदे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
निघोज आणी परिसरातील कपिलेश्वर मंगल कार्यालयात संदीप पाटील वराळ महसूल विभागाने शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात दि. २७ मे ते दि.३० मे पर्यंत करणार आहे. यामध्ये ना,श्री, राधाकृष्ण विखे पाटील मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी योजना अंतर्गत राशन कार्ड व संजय गांधी निराधार योजना शिबिर, नवीन रेशनकार्ड , विभक्त रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/निवृत्ती वेतन विधवा/अपंग योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दिनांक २७ ते ३० मे २०२३ रोजी सकाळी,:९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
या शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राहुल शिंदे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सुप्याचे सरपंच दत्ता पवार, डॉ.राहुल विखे पाटील निघोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी केले आहे. यावेळी डॉ.राहुल विखे पाटील, पठारवाडी गावचे सरपंच भास्करराव सुपेकर, उपसरपंच दौलतराव सुपेकर, युवा नेते कुंडलिक पठारे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार ,अंकुश घोगरे,दत्ता घोगरे, सुनील घोगरे,दिलीप कवडे, हरीश ससाने आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परिसरातील गावांत तसेच वाडीवस्तीवर महसूल आपल्या दारी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी डॉ राहुल विखे पाटील व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली मेळावे घेऊन लोकप्रबोधन करण्यात आले.
COMMENTS