अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचे वजनदार नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी अमृत पाणी यो...
अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचे वजनदार नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी अमृत पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर बायपास कनेक्शन देण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असताना यास आता विरोध वाढू लागला आहे. भाजप नेते माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र देऊन असे कोणतेही कनेक्शन देऊ नये, अशी मागणी केली आहे.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की अमृत पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेच्या मुख्य जलवाहिनीवर टॅब (बायपास कनेशन) न देण्यात येऊ नये. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन त्याची चाचणी सुरू झाली आहे. अमृत योजनेच्या वाहिनीवरूनही वसंत टेकडीपर्यंत पाणी आणण्याची चाचणीही घेतली आहे. या मुख्य जलवाहिन्यांसह शहरातील विविध टाया व भागांना पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांवरून सर्व नगरवासियांना समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून नगरकर ही पाणी योजना पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत.
अमृत पाणी योजनेच्या मुख्य जल वाहिनीवर व इतर मुख्य जलवाहिन्यांवर बायपास नळ कनेशन न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला, हे योग्यच आहे. उंच टायाद्वारे असलेल्या वितरण व्यवस्थेवरून सर्व भागात पाणीपुरवठा व त्यावरून कनेशन देण्यात यावे. महासभेने सभेत यावर धोरण निश्चित करून तसा ठराव करावा. ज्या भागात वितरणासाठी जलवाहिनी टाकली नाही, त्यासाठी तातडीने निधी देऊन जल वाहिन्यांची कामे करावीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अमृत पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवरून थेट कनेशन, थेट पाणी पुरवठा करू नये.
शहरातील विविध भागात मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी अनधिकृत बायपास कनेशन घेण्यात आले आहेत. असे कनेशन मुख्य जलवाहिनी वरून देण्यात येऊ नयेत. मुख्य जलवाहिन्यांवरून टॅब मारून कनेशन दिल्यामुळे नागरिकांना पूर्ण दाबाने समान पाणी पुरवठा होत नाही. यापूर्वी खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीतही या टॅबचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यांनीही टॅब बंद केल्याशिवाय व थेट कनेशन बंद केल्याशिवाय शहर व उपनगर भागाचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
काही नगरसेवकांचा अमृत पाणी योजनेवरच थेट कनेशन पाहिजे, असा हट्ट सुरू आहे. मुळातच हे नियमाला धरून नाही. तसे आश्वासन या नगरसेवकांना ज्या अधिकार्यांनी दिले असेल, त्यांची प्रथम चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास कारवाई करावी. ज्या भागात मुख्य जलवाहिनी टाकली नाही तेथे गरजेनुसार १८ इंची, २४ इंची जलवहिनी टाकून संबंधित भागास पाणीपुरवठा करावा.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनीही मुख्य जलवाहिनी वरून टॅब दिल्यास व त्यामुळे प्रेशर कमी झाल्यास सर्व जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असे लेखी पत्र वजा नोटीस देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे महासभेत मुख्य जलवाहिन्यांवरील टॅब व कनेशन बंद करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. सर्व भागात वितरण व्यवस्थेसाठी टाकलेल्या जलवाहिन्यांद्वारे कनेशन द्यावेत. या उपरही कोणत्या एका ठराविक भागासाठी नगरसेवकांच्या हक्कासाठी अमृत पाणी योजना व इतर मुख्य जलवाहिन्यांवरून थेट कनेशन दिल्यास किंवा टॅब दिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका आयुक्तांची राहील.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यासंदर्भात चुकीचा निर्णय घेतल्यास तो विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावा अन्यथा भविष्यात शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्यास आयुक्त संबंधित उपायुक्त व संबंधित विभाग प्रमुख व्यक्तिशः जबाबदार राहतील. महासभा व प्रशासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS