छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायकप्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने विवाहित...
छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायकप्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहीती नुसार,छत्रपती संभाजीनगर शहरातील टाऊन हॉल भागात राहणारी पीडिता रस्त्याने येत जात असताना आरोपी मुख्तार आक्षेपार्ह कपडे घालून तिला अश्लील हातवारे करायचा. त्याच्याकडे पीडितेने दुर्लक्ष केल्यावर आरोपीने तिचा पाठलाग करायला सुरवात केली.तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.
दरम्यान महिला आपल्या धमकीला घाबरत असल्याची मुक्तार याच्या लक्षात आली. दरम्यान त्यांनी १२ मार्च रोजी महिलेला गाठले महिलेला धमकी देत टाऊन हॉल येथील घरी बोलावले. पिडीत महिला जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुख्तार याने तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले. पाणी पिल्यावर महिला काही वेळाने अचानक बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत मुख्तार खानने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनविला.
राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने संबंधित महिलेला घरी बोलावले आणि पाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गीक अत्याचार केला.एवढ्यावर न थांबता अत्याचार करताना व्हिडिओ बनवत महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले.
COMMENTS