पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.परंतु टपरी चालविण्यासाठी दरमहा हप्ता मागुन तो देण्यास नकार दिल्याने टपरी चालकाच्या कुटुंबीयांना गुंडाच्
मुंबई / नगर सह्याद्री -
पान टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.परंतु टपरी चालविण्यासाठी दरमहा हप्ता मागुन तो देण्यास नकार दिल्याने टपरी चालकाच्या कुटुंबीयांना गुंडाच्या टोळक्याने बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजता काळेपडळ येथील बालाजी पान दुकानासमोर घडली.
फिर्यादी हे पान टपरी चालवतात. प्रशांत तिकोटे आणि त्यांच्या साथीदारांनी पान टपरी चालवण्यासाठी महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता मागितला. त्यांनी हप्ता भरण्यास नकार दिला. फिर्यादी, त्यांचा मुलगा व पत्नी पान टपरीवर असताना गुंडांनी त्यांना बांबूने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करत आहेत.
वानवडी, पुणे येथील काळेपडाळ येथील ५२ वर्षीय टपरी चालकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडाळ, हडपसर) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS