अहमदनगर | नगर सह्याद्री - सावेडी उपनगरातील बंधन लॉन येथे महिलेची नजर चुकवून दोन लाख रुपये असलेली पैशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याच...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
सावेडी उपनगरातील बंधन लॉन येथे महिलेची नजर चुकवून दोन लाख रुपये असलेली पैशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी यमुना रघुनाथ लांडगे (रा. लांडगे मळा, देहरे, ता. जि. अहमदनगर) यांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुर्हा दाखल केला आहे.
१२ मे रोजी बंधन लॉन येथे एका लग्नासाठी युमना लांडगे आल्या होत्या. लग्न सोहळा आटोपल्यानंतर मंगल कार्यालयाचे भाडे देण्यासाठी व केटरिंगचे भाडे देण्यासाठी जावई सुनील दादा गोपाळे (रा. देहरे, ता. नगर) यांनी दोन लाख रुपये व दोन मोबाईल असेलेली बॅग दिली. ती बॅग घेऊन खुर्चीवर बसले असतांना अंगाला खाज येवू लागली. त्यावेळी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून पळविली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना दोन इसमांनी ती बॅग पळविल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS