दागिणे, मोटारसायकल हस्तगत | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहमदनगर | नगर सह्याद्री पाथर्डी परिसरात घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपींना जेरबंद क...
दागिणे, मोटारसायकल हस्तगत | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर | नगर सह्याद्री
पाथर्डी परिसरात घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यांच्याकडून ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल जप्त केली आहे.
आरोपींमध्ये अरुण अभिमान काळे (वय २४, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड), पवन भरत काळे (वय १९ रा. हरिनारायण आष्टा, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे. अरुण काळे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, बीड, अहमदनगर जिल्ह्यात चोरी, गंभीर दुखापत आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी किरण रमेश लाटणे (वय ४३, रा. जयभवानी चौक, ता. पाथर्डी) यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातून ९५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, भीमराज खर्से, संतोष लोढे, संदीप दरदंले, फुरकान शेख, पोकॉ रविंद्र घुगांसे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमले.
पोलिस निरीक्षक आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेले सोन्याचे दागिणे विक्री करण्यासाठी दोन इसम मोटार सायकलवर शेवगांवच्या दिशेने जाणार असल्याचे समजले. आहेर यांनी ही माहिती पथकास कळविली. पथकाने तात्काळ तिसगांव येथे सापळा लावून दोन संशयितांचा पाठलाग करुन पकडले. अंगझडतीमध्ये एका प्लॅस्टीक पिशवीत सोन्याचे दागिणे मिळून आले. त्याबाबत विचारपूस केली असता पाथर्डी परिसरात घरात घुसून चोरी केलेले सोने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. आरोपींकडे चौेकशी केली असता जयभवानी चौक व तनपुरवाडी (ता. पाथर्डी) येथील घरात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व ५० हजार रुपये किंमतीची काळे रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आले.
COMMENTS