अहमदनगर | नगर सह्याद्री मोटारसायकल बाजुला घ्यावी म्हणून हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने मोटारसायकल स्वाराने एसटी चालकास शिवीगाळ केली. विटकर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
मोटारसायकल बाजुला घ्यावी म्हणून हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने मोटारसायकल स्वाराने एसटी चालकास शिवीगाळ केली. विटकर, सिमेंटचा तुकडा फेकुन मारत जमखी केले. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीष लक्ष्मणराव बिरादार (वय ३६ वर्ष, धंदा नोकरी, रा. सैनिकनगर, भिंगार) यांनी मोटारसायकल (क्र. एमएच १६ सीएल २६१३) चालकाविरुद्ध भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १ मे रोजी दुपारी पावणे तीन वाजता एसटी चालक हरीष बिरादार त्याच्या ताब्यातील बस (क्र. एचएच ४० एन ९१६१) ही नगर पाथर्डी रोडवर भिंगार वेस येथून जात असताना रोडवर मोटार सायकल (क्र. एमएच १६ सीएल २६१३) ही उभी असल्याने ती बाजूला काढावी म्हणून हॉर्न वाजविला. एकाने मोटारसायकल बाजूला उभी करुन एसटी चालकाच्या दिशेने हातात विटकरीचा व सिमेंंटचा तुकडा घेऊन गेला. तुला दम निघत नाही का, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. विटकरीचा व सिमेंटचा तुकडा फेकून मारुन दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS