अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कमी ३८ अंश सेल्सीअस इतका असलेला तापमा...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कमी ३८ अंश सेल्सीअस इतका असलेला तापमानाचा पारा आता ४० अंशावर पोहचला आहे. यामुळे उष्णतेच्या तिव्र झळा जाणवत असून जणू ही धोक्याची घंटाच आहे.
एप्रिल महिना अवकाळी पावसात गेल्यामुळे यंदा एप्रिल हॉट ठरला नाही. मे महिन्याचा पहिला आठवडाही दिलासादायक होता. मात्र, सोमवारपासून तापमान वाढीचा अनुभव येऊ लागला. गुरुवारीही अहमदनगरच्या कमाल तापमानाचा आकडा ४० अंशांवर गेला आहे. दुपारी १२ ते ३ बाहेर जाणे टाळावे असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केली आहे.
उष्णतेचा प्रकोप वाढल्याने प्रशासन अलर्ट
हलकी, पातळ व सुती कपडे वापरावेत. प्रशासनाने उष्मा लाटेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा, दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS