एसबीआयनंतर पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून लोकांमध्ये कोणताही गैरसमज होणार नाही.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नुकतेच २,००० रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने लोकांना २,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जुने फॉर्म व्हायरल झाले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये पैसे जमा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की २,००० रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणताही ओळखपत्र द्यावा लागणार नाही किंवा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. २,००० रुपयांच्या नोटासुद्धा एकावेळी २०,००० रुपयांपर्यंत सहज बदलता येणार. त्याच वेळी, आता एसबीआयनंतर पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून लोकांमध्ये कोणताही गैरसमज होणार नाही.
२,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त वैयक्तिक माहिती मागणारे जुने फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यावर लोकांना सत्य काय आहे हे समजू शकले नाही. कारण कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही, असे आरबीआयच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आता पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन व्हायरल होणाऱ्या फॉर्मबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बँकेचे म्हणणे आहे की २,००० रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही आधार कार्ड किंवा अधिकृत सत्यापित दस्तऐवज (ओव्हिडी) आवश्यक नाही. तसेच, कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. या संदर्भात बँकेच्या सर्व शाखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) स्पष्ट केले होते की लोकांना २,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. लोक त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन सहज नोटा बदलू शकतात. नोटा जमा करण्यासाठी आरबीआयच्या बँकिंग ठेव नियमांचे पालन केले जाईल. एका दिवसात लोक २,००० रुपयांच्या १० नोटा म्हणजेच २० हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही. जर तुम्ही बँक खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्हाला पॅन, आधार कार्ड दाखवावे लागेल.
COMMENTS