सुरुवातीला एक दुचाकी आणि दहा मोबाईल सापडले. अधिक चौकशी केली असता १५ दुचाकी सापडल्या. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले.
मुंबई / नगर सह्याद्री -
दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित आरोपी हा चोरीच्या दुचाकी व मोबाईल फोन विकण्यासाठी नवी पेठ, सोलापूर येथे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला एक दुचाकी आणि दहा मोबाईल सापडले. अधिक चौकशी केली असता १५ दुचाकी सापडल्या. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दुचाकी चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान जी.एम. या व्यक्तीने चोरीच्या दुचाकी व मोबाईल फोन नवी पेठेतील चौकातून विक्रीसाठी येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. अविनाश आसवे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल आणि १० चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
COMMENTS