मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिचा पती आदिल खान अद्यापही तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी राखी हिने पती आदिल याच्यावर मारहाण,...
मुंबई :
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिचा पती आदिल खान अद्यापही तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी राखी हिने पती आदिल याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून विकल्याचे आरोप केले आहेत. ज्यामुळे ड्रामा क्विनचा पती वादाच्या भोवर्यात अडकला आहे. राखीने नुकताच खुलासा केला आहे की, तिला तुरुंगातून फोन आला आणि आदिल तिची माफी मागत आहे.
आदिल याचा फोन आल्यामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरली असल्याचं देखील समोर येत आहे. सध्या सर्वत्र राखी सावंत आणि आदिल खान यांची चर्चा रंगत आहे. जर राखीने यावेळी पती आदिल याला माफ केलं तर, तिच्या जीवाला धोका असू शकतो असं राखी सावंत हिचं म्हणणं आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखी तुरुंगातून आदिल याचा फोन आल्यामुळे चर्चेत आहे.
राखी म्हणाली, तुरुंगातून आदिल खान याचा फोन आला होत. मी त्याला म्हणाली लवकर बाहेर ये आणि मला घटस्फोट दे तो म्हणाला मला माफ कर मी तुला घटस्फोट देणार नाही. मी म्हणाली, तू माझं आयुष्य खराब केलं आहे. मी पुन्हा तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. आता पुन्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही मी तेव्हा घाबरली होतीफ असं देखील राखी म्हणाली. पुढे राखी म्हणाली, प्रश्न माफी मागण्याचा नाही. न्यायाधीशांनाही मी म्हणेन की माझ्या जागी त्याची बहीण आहे, असं समजून त्यांनी विचार करा. यावेळी मी त्यावा माफ केलं तर माझ्या जीवाला धोका आहे. एकच आयुष्य आहे, त्यामुळे मी स्वतःच माझा जीव कसा देऊफ असं देखील राखी म्हणाली. राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
COMMENTS