मुंबई - अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिच्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्...
मुंबई -
अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिच्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी त्याला पसंतीची पावती दिली आहे. या चित्रपटात क्रितीने माता सीतेची भूमिका साकारली आहे.
दरम्यान एका मुलाखतीत क्रितीने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांना उजाळा दिला. अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, ती तिच्या पहिल्या फोटोशूटदरम्यान खूप नर्व्हस झाली होती. शूट चांगले न झाल्याने तिच्या डोळ्यात अश्रू रडळले होते. ती रडत रडत घरी पोहोचली होती. ती म्हणाली, जेव्हा आपण आपल्या कामाबाबत खूप गंभीर असतो आणि असे असूनही जेव्हा ते मनाप्रमाणे होत नाही तेव्हा खूप वाईट वाटते. हार्पर बाजारला दिलेल्या मुलाखतीत कृती म्हणाली- 'माझी आई प्रोफेसर आहे आणि आमच्या कुटुंबात काम करणारी ती पहिली महिला आहे. जेव्हा ती मला जन्म देणार होती, त्याकाळात तिने तिचे पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.
मी माझ्या बहिणीपेक्षा मोठी आहे. घरात मोठे असल्याने तुम्हाला घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागते. त्यामुळे मी जे काही करते त्यात मी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करते. माझ्या मते, हा स्वभाव माझ्यात जन्मापासून आला आहे. जेव्हाही काही चांगले घडत नाही तेव्हा माझी चिडचिड होते.' क्रिती पुढे म्हणाली- 'माझ्या पहिल्या फोटोशूटवेळी मी खूप नर्व्हस होते. नंतर शूट थोडे खराब झाले होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटले होते. मी रडत रडत घरी आले होते. मी चांगले करू शकले नाही, याचा मला खूप त्रास झाला होता. पण काळाबरोबर लोकांमध्ये आत्मविश्वास येतो. मला असे वाटते की, तुम्ही तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशातून जास्त शिकता. चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा माझा मंत्र आहे.' क्रिती सध्या 'द क्रू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली- 'सध्या मी 'द क्रू'साठी शूटिंग करत आहे. हा माझ्यासाठी खूप इंट्रेस्टिंग प्रोजेक्ट आहे.यात मी दोन अप्रतिम अभिनेत्रींसोबत काम करत आहे. सहसा आपण अनेक पुरुष कलाकारांसोबत काम करतो, पण दोन महान अभिनेत्रींसोबत काम करणे हे स्वप्नासारखे असते. मला काम करताना खूप मजा येतेय,' असे क्रितीने सांगितले.
COMMENTS