मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. जीम लुक असो, एअरपोर्ट लुक असो वा कुठल्या मोठ्या इव्हेंटचा लुक असो. कत...
मुंबई :
अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. जीम लुक असो, एअरपोर्ट लुक असो वा कुठल्या मोठ्या इव्हेंटचा लुक असो. कतरिना प्रत्येक लुकमध्ये खुलून दिसते. सध्या तिचा एअरपोर्टलुक सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे.
मध्यंतरी तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. यावेळी तिचा लुकपाहून चाहते हैराण झाले आहेत. काही दिवसांपुर्वी ऐश्वर्याच्या लुकमुळे ती ट्रोल झाली होती. आता कतरिना आपल्या एअरपोर्ट लुकमुळे ट्रोल झाली आहे. यावेळी कतरिनानं हटके वेस्टर्न स्टाईल सूट घातला होता परंतु त्यावर तिनं घातलेला जॅकेट मात्र नेटकर्यांना आवडला नाही. हल्ली फॅशन ही खूप मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते आहे. फॅशनला एक वेगळाच स्वॅग निर्माण झाला आहे.
फॅशनसोबत अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं लोकं खेळताना दिसतात. या व्हिडीओमध्ये कतरिनाचंही काहीचं असंच झालं आहे. आपल्या सूटवरती तिनं जॅकेट तर घातला होता परंतु तो अर्धवटचं घातला होता, म्हणजे घातला नव्हताच फक्त आपल्या दंडांपर्यंत ठेवला होता. हे पाहून तिला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. एका नेटकर्यानं म्हटलंय की, मफअरे मॅडम जर जॅकेट घालायचा नाहीये तर काढून टाका ना.फफ तर दुसर्या एकानं लिहिलंय की, मफअरे जॅकेट तरी घाला असा पडात काय जाता आहातफफ, तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, मफही कसली फॅशन आहे?कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना कोण उधाण आले होते. त्यातून आता पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या तिच्या या व्हिडीओखालीही चाहते नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. काही नेटकर्यांनी कतरिना पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपुर्वीच विकी कौशलनं आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्यांनी एकत्र एकमेकांसोबत वेळ घालवला होता.
COMMENTS