पुण्यात अवैध वेश्या व्यवसायाच्या दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये स्पा सेंटर आणि आयुर्वेदिक सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा
मुंबई / नगर सह्याद्री -
पुण्यात अवैध वेश्या व्यवसायाच्या दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये स्पा सेंटर आणि आयुर्वेदिक सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या मोहिमेत पोलिसांनी एकूण ८ मुलींची वेश्याव्यवसायाच्या तावडीतून सुटका केली असून त्यापैकी ६ विमान नगर आणि २ सिंहगड रोड परिसरातील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील विमान नगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे केले गेले होते. पोलिसांनी तेथे छापा टाकून ६ मुलींची सुटका केली. यासह आरोपी मनिकंठ राहुल नायडू, विशाल अगरवाल, नायडू बाई, नितीन माने यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सिंहगड रोड परिसरातील एका आयुर्वेदिक केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून २ मुलींची सुटका केली आहे. पुणे शहरात अवैध वेश्याव्यवसायाची प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यात गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या १२ मुलींची सुटका केली आहे.
COMMENTS