मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अशाच प्रकारचे घरगुती काम करणाऱ्या महिला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील उच्चभ्रू वर्ग घरांमध्ये घरकामासाठी मोलकरणी ठेवल्या जातात. पण अशी मोलकरीण तुमचं घर कधी साफ करेल हे कळणार नाही. मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अशाच प्रकारचे घरगुती काम करणाऱ्या महिला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
तक्रारीनंतर बीकेसी पोलिसांनी धारावी परिसरातून तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाख रुपये रोख आणि घड्याळ जप्त केले. सध्या या तिन्ही महिला आरोपी बीकेसी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी इतरत्र चोरी केली आहे का, या टोळीत आणखी कोणकोणत्या महिलांचा समावेश आहे. याचा तपास बीकेसी पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला संकुलात राहणारे फिर्यादी हे उन्हाळी सुट्टी निमित्त १४ एप्रिल ते ६ मे या काळात मुंबई बाहेर फिरण्यासाठी गेले होते ही बाब त्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला माहिती होती याच संधीचा फायदा घेऊन तिने घराच्या कपाटातील ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ चोरी केले.
फिर्यादी जेव्हा सुट्टी वरून मुंबईत आपल्या घरी परतले असता त्यांना कपाटात हे साहित्य न दिसल्याने त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एका घरावर छापा टाकून आरोपींनी लपवून ठेवलेले ३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ३५ लाख रुपयांची रोकड आणि घड्याळ जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेली एक महिला मुंबईतील वांद्रे उपनगरातील एका इमारतीत मोलकरीण म्हणून काम करत होती.
ज्या घरात ही महिला काम करत होती त्या घराचा मालक काही काळासाठी घराबाहेर राहणार असल्याचे समजले. त्यानुसार मोलकरणीने तिच्या इतर २ महिला साथीदारांसह एक योजना आखली. घरमालक बाहेर असताना या टोळीने १४ एप्रिल ते ६ मे दरम्यान घरफोडी केली.
COMMENTS