बाजार समिती सभापती व उपसभापतींनी घेतला पदभार पारनेर | नगर सह्याद्री पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा विक्रीसाठी महाराष्ट्रात नावलौकि...
बाजार समिती सभापती व उपसभापतींनी घेतला पदभार
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा विक्रीसाठी महाराष्ट्रात नावलौकिक असून या बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकर्यांची हितासाठी व न्यायासाठी बाजार समितीमध्ये काम करावे असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले आहे. बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे उपसभापती भाऊसाहेब शिर्के यांनी बुधवारी पदभार घेतला असून यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लंके म्हणाले की शेतरकरांची कामधेनू म्हणून ओळखले जाणार्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड खेळीमेळीत झाली आहे.
शेतकर्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. महाविकास आघाडीने बाजार समिती निवडणूक एकदम खेळीमेळीत लढवत १८ जागा निवडून आल्या आहेत. सभापती व उपसभापती यांनी पदभार घेतला आहे. माजी सभापती प्रशांत गायकवाड यांनी ५ वर्षात चांगले काम केले आहे.कोल्ड स्टोअरचे काम प्रगतीपथावर असून मागील सभापती व उपसभापती काम पुढे नेण्याची जबाबदारी नविन सभापती व उपसभापती यांच्या वर राहणार आहे.
बाजार समिती रोडचे काम दोन महिन्यात मार्गी लावणार; आमदार लंके
बाजार समितीच्या सभापती पदी बाबाजी तरटे व उपसभापती भाऊसाहेब शिर्के यांनी पदभार घेतल्यानंतर सभापती बाबासाहेब तरटे यांनी आपल्या भाषणामध्ये पारनेरच्या मुख्य रस्त्यापासून बाजार समितीकडे येणारा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे या बाजार समितीकडे येणार्या रस्त्याचे काम दोन महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन तातडीने आमदार नीलेश लंके यांनी आपल्या भाषणात दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, माजी आमदार विजय औटी, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करूनच या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात माजी सभापती प्रशांत गायकवाड यांनी बाजार समितीत एक आदर्श काम केले. महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन तिन्ही पक्षांना बरोबर येत एक आदर्श बाजार समिती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे संचालक माजी सभापती प्रशांत गायकवाड, आबासाहेब खोडदे, संदीप सालके, विजय पवार, किसनराव रासकर, चंदन रमेश बळगट, तुकाराम दत्तू चव्हाण या संचालकासह जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, माजी सभापती दिपक पवार, मारुती रेपाळे, कारभारी पोटघन, डॉ. बाळासाहेब कावरे, नंदू देशमुख, योगेश मते, भुषण शेलार, डॉ. सादिक राजे, भागुजी झावरे, श्रीकांत चौरे, सुभाष शिंदे, बाळासाहेब नगरे, सचिन औटी यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती बाबासाहेब तरटे म्हणाले की, ज्या धर्तीवर माजी सभापती प्रशांत गायकवाड यांनी काम केले. त्याप्रमाणे आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम उभे करणार आहे. मला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार नीलेश लंके व संचालक मंडळाने जी संधी मिळाली आहे. त्याबद्दल तरटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यापुढील काळात आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व नुतन सभापती व उपसभापती माध्यमातून राहिलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे. यापुढील काळात शेतकरी वर्गाच्या हितासाठी व न्यायासाठी सर्व तरी प्रयत्न करण्याचे आश्वासन व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारुती रेपाळे यांनी दिले आहे.
COMMENTS