अमरावती | नगर सहयाद्री - राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसल...
अमरावती | नगर सहयाद्री -
राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे भर उन्हाळ्यात पुर्ना नदीला पूर आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात आज अवकाळी जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. अमरावती जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या पुर्ना नदीला पूर आला आहे.शेगाव तालुक्यातील मुख्य जलवाहिनी असलेली पूर्णा नदी २० वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णा नदी मे महिन्यात पूर्णतः आटलेली असते.
नदीकाठचे रहिवासी नदीपात्रात झरे खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी आणतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने सर्वांना आनंद झाला. पूर्णा नदी वाहू लागल्याने मनसगाव, पहूरपूर्णा, खातखेड, बोंडगाव, सगोडा, भास्तन, कालवड, कठोरा, डोलारखेड या परिसरातील जनावरांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. दुसरीकडे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS