छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिस स्टेशन परिसराती...
छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय 5) असे गळफास घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संभाजीनगरजवळील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव इथली हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आज उघडकीस आली आहे.
घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय मिळवटून टाकणारा प्रकार घडला असावा. सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते.शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या त्यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले आहेत.
COMMENTS