पुणे । नगर सह्याद्री - एक धक्कदायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मनसे नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेचे पुणे शहर ...
पुणे । नगर सह्याद्री -
एक धक्कदायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मनसे नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
साईनाथ बाबर हे पुण्यातील एनआयबीएम रोडवरील एका सोसायटीतील राहायला असून त्यांच्याच सोसायटीतील एका महिलेने ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हवा पिर खान असे धमकी देणाऱ्या महीलेचे नाव आहे.
बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत आसताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.
या आधी देखील मनसेच्या काही नेत्यांच्या मुलांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे धमकीचं पत्र ठेवले होते. "सावध राहा रुपेश" अशा आशयाची चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. १७ जून रोजी ही धमकी आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे.
COMMENTS