मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने १६आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने १६आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे म्हणले आहे.तत्पुर्वी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा रंगली आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षावरील निकाल अखेर जाहीर झाला. ज्यामध्ये उद्धव ठाकर यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता, असे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळेच सरकार अडचणीत आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती’ या पुस्तकात देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला होता. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले होते.
COMMENTS