अहमदनगर / नगर सह्याद्री - स्वेदगंगेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते, दिनदलितांचे कैवारी, नगर जिल्हा...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
स्वेदगंगेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते, दिनदलितांचे कैवारी, नगर जिल्हा हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे रविवार दिनांक 23 मे 2023 रोजी लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते अनावरण होत आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य हमाल मापाड़ी महामंडळाचे अध्यक्ष, जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पदमश्री पोपटरावजी पवार, नगर शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैय्या जगताप, मा.आमदार शिवाजीराव कर्डिले मा.आमदार दादाभाऊ कळमकर, अहमदनगर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत, तसेच आपण सर्व सन्माननीय हितचिंतक, मार्गदर्शक, आप्तेष्ट नातेवाईक तसेच मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
COMMENTS