पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती - आबासाहेब सोनवणे अहमदनगर / नगर सह्याद्री- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राची राज्यस्तरीय पदाधिकार...
पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती - आबासाहेब सोनवणे
अहमदनगर / नगर सह्याद्री-
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राची राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यशाळा सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता, पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना समिती महाराष्ट्र, यांच्या अध्यक्षतेखाली, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड विकास जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी राज्यविश्वस्त राणीताई पाटील, अश्विनीताई थोरात, राजीव पोतनीस, आनंदराव जाधव, किसन जाधव, शिवाजी आप्पा मोरे, पांडुरंग नागरगोजे, सुधीर पठाडे, नारायण वनवे, सुप्रियाताई जेधे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांमधून आगामी नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती कार्यक्रम, तसेच सरपंच परिषदेमध्ये काम करणाऱ्या व ग्रामविकासाचे शिल्पकार असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्यातील सरपंच परिषदेच्या राज्य विभाग जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी यांच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
बैठकीचे ठिकाण-साई पालखी निवारा नगर मनमाड रस्ता (निमगाव निघोज)शिर्डी ता.राहता जि. अहमदनगर आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष आबासाहेब सोनवणे, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ कर्डिले, थिटे सांगवी श्रीगोंदाचे सरपंच अर्जुन देवा शेळके, राहुरी तांभेरेचे सरपंच नितीन नागरे, सारोळा कासारच्या सरपंच आरती कडूस, नांदगावचे सरपंच सखाराम सरक, विळदचे सरपंच संजय बाचकर, दहिगावचे सरपंच मधुकर मस्के, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, पारनेरचे मोहनराव रोकडे, मा.सभापती गंगाराम शेठ बेलकर, कासारे सरपंच शिवाजी निमसे, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, संगमनेरचे जालिंदर गागरे, अकोला कळंबच्या उपसरपंच शकुंतला खरात कदम इत्यादींनी आव्हान केले आहे.
COMMENTS