मुंबई | नगर सहयाद्री बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. अलीकडेच दो...
मुंबई | नगर सहयाद्री
मुलाखतीदरम्यान आलियाला विचारण्यात आले की, रणबीरकडे अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या तुला हेवा वाटतो? यावर आलिया म्हणाली, रणबीरचा स्वभाव अत्यंत शांत असून तो संत प्रवृत्तीचा माणूस आहे. तो काय शांत डोयाने विचार करतो या गोष्टीचा मला खूप हेवा वाटतो. पुढे आलिया स्वत:च्या स्वभावाविषयी सांगताना म्हणाली, मी जेव्हा भडकते आणि मोठ्या आवाजात बोलते किंवा चिडचिड करते, या गोष्टी रणबीरला अजिबात आवडत नाहीत. रणबीरला या गोष्टी आवडत नसल्याने, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, असेही आलियाने सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रणबीरचा तू झुठीं में मक्कार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात श्रद्धा कपूर रणबीरसह प्रमुख भूमिकेत होती. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच करण जौहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असेल.
COMMENTS