चालकाअभावी खोळंबलेली बस आ. नीलेश लंके यांच्या फोननंतर मार्गस्थ पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांची फोनवर क...
चालकाअभावी खोळंबलेली बस आ. नीलेश लंके यांच्या फोननंतर मार्गस्थ
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांची फोनवर काम करण्याची पद्धत सर्वश्रुत असून पैठणकरांचा फोन आमदार नीलेश लंके यांना भल्या पहाटे खणखणला. आणि या फोनला प्रतिसाद देत शिरूर बसस्थानकावर तब्बल दोन तास रखडलेली बस आमदार नीलेश लंकेचा फोन जाताच मार्गस्थ झाली. त्यामुळे मतदार संघा बाहेरील जनतेमध्ये जे कुतुहल व उत्सुकता होती तिचा अनुभव या प्रवाशांना आला आहे.
वेळ बुधवारी पहाटे पावणे दोनची.... ठिकाण शिरूर बस स्थानक, प्रवाशांनी खचाखच भरलेली बस चालकाअभावी शिरूर बस स्थानकावर तब्बल दोन तास रखडली होती. आ. नीलेश लंके यांना त्याबाबत माहिती देताच थेट बसस्थानकात जात लंके यांनी संबंधितांशी संपर्क करीत पर्यायी चालक उपलब्ध करून बस मुंबईकडे मार्गस्थ केली. आ. लंके यांच्या या सामाजिक बांधिलकीचे बसमधील प्रवाशांनी कौतुक केले. त्यांची समस्या दूर केल्याबददल कृतज्ञताही व्यक्त केली.
पैठणहून मुंबईकडे निघालेल्या बसचा चालक शिरूर येथे बदलला जातो. नेहमीप्रमाणे बस शिरूर बसस्थानकावर आली. पहिला चालक बस सोडून निघून गेला. त्याच्या जागेवर दुसरा चालक मात्र आलाच नाही. संबंधित चालकाचा मोबाईलही बंद होता. शिरूर बस स्थानकावरील रात्रपाळीसाठी असलेले वाहतूक निरीक्षकही जागेवर नव्हते. दोन तास बसचा खोळंबा झाल्यानंतर एका प्रवाशाने आ. नीलेश लंके यांना फोन करून निर्माण झालेल्या समस्येविषयी अवगत केले. आ. निलेश लंके यांच्याशी संपर्क झाला.
त्यावेळी लंके हे शिरूरजवळून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांनी चालकास शिरूर बस स्थानकावर त्यांचे वाहन घेण्यास सांगत काही वेळात ते तेथे पोहचले. पैठण आगाराच्या आगार प्रमुखांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहीती दिली त्यांनी दिली. शिरूर आगाराच्या यंत्रणेस फैलावर घेऊन दुसरा चालक तात्काळ उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्यानंतर काही मिनिटात दुसरा चालक देण्यात आला व बस मुंबईकडे रवाना झाली.
COMMENTS