अहमदनगर | नगर सह्याद्री नगर येथे होत असलेल्या राज्य हमाल-मापाडी महामंडळाच्या बैठकीत २१ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर येथे होत असलेल्या राज्य हमाल-मापाडी महामंडळाच्या बैठकीत २१ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा सत्कार महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ व जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, बाळासाहेब वडागळे, बहिरु कोतकर, रविंद्र भोसले, रामा पानसंबळ, बबन आजबे, नवनाथ बडे, संजय महापुरे, नारायण गिते, भाऊसाहेब वाबळे, पांडूरंग चक्रनारायण, मच्छिंद्र दहिफळे, राजू चोरमले, गणेश बोरुडे, राहुल घोडेस्वार, रत्नाबाई आजबे, आदिनाथ चेके, शेख अब्दुल गणी, कमल डहाणे, अंबादास दहिफळे, नंदू डहाणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतने राज्याला दिशा दर्शक काम केले आहे. हमाल-मापाडी यांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्याचे काम होत आहे. यामध्ये स्व.शंकरराव घुले यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा हमाल-मापाडी महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन नगरमध्ये होत आहे, ही नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, आपली स्वागताध्यक्षपदी निवड करुन जो सन्मान दिला आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून आदर्शवत अधिवेशन यशस्वी करु, असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, राज्यातील हमाल-मापाडी यांचे प्रश्न, त्यांच्या उन्नत्तीसाठी हमाल-मापाडी महामंडळ कार्यरत राहून कष्टकर्यांचे जीवनमान उंचावत आहे. नगरमध्ये दिनांक २१ मे २०२३ रोजी बाजार समिती आवारातील भाजीपाला विभागात होत असलेल्या या अधिवशेनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते तर कष्टकर्यांचे नेते महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. या अधिवेशनात विविध विषयांवर मान्यवर, तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध ठराव या अधिवेशनात मांडून ते मंजूर करण्यात येणार आहेत. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी आ.संग्राम जगताप यांची निवड झाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन दिशादर्शक असेच होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ म्हणाले, हमाल-मापाडी महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशनात हमाल-मापाडी यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मोलाची भुमिका बजवेल. त्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, राज्यातील हमाल-मापाडी यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त हमाल-मापाडी यांनी या अधिवशेनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार गोविंद सांगळे यांनी मानले.
COMMENTS