निघोज | नगर सह्याद्री गेली २५ वर्षात पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे व ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई ...
निघोज | नगर सह्याद्री
गेली २५ वर्षात पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे व ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई वरखडे यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे व ग्रामपंचायतच्या माजी सदस्या आशाताई वरखडे यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवार दि.९ रोजी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते व समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निघोज व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या या सत्कार कार्यक्रमात विविध संस्था व्यक्ती यांच्या हस्ते वरखडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सोमनाथ वरखडे बाजार समितीचे स्वीकृत संचालकआमदार नीलेश लंके यांनी यावेळी सोमनाथ वरखडे यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले मात्र कधीच काही मागीतले नाही आज मात्र त्यांना एक भेट देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थीतांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी आमदार लंके यांनी वरखडे यांना पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत संचालक पद देण्याचे जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषनेचे जोरदार स्वागत केले.
आमदार लंके यावेळी म्हणाले वरखडे यांचे सामाजिक, धार्मिक, सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात योगदान आहे. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणी प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांनी पक्ष स्थापनेपासून महत्वाचे काम केले आहे. समाजासाठी विकासकामे करताना कामांचा पाठपुरावा करीत या दांम्पत्याने संसार करुण सामाजिक कामांना प्राधान्य देण्याचे काम केले आहे.
यावेळी समाधान महाराज शर्मा यांनी किर्तनरूपी सेवेतून सोमनाथ वरखडे व आशाताई वरखडे यांच्या जिवणकार्याचा परिचय देत वरखडे कुटुंबाचे कौतुक केले. धार्मिक संस्कृती वाढविण्यासाठी या कुटुंबाने खर्या अर्थानं काम करीत धर्मसंस्कृतीसाठी सर्वाधिक योगदान दिले आहे. पारनेर, शिरुर, श्रीगोंदा, पुणे, मुंबई परिसरातील सोमनाथ वरखडे यांचा मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS