मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र की अपात्र? हा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. त्यातच एक मोठं वृत्त हती आलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देवू शकतात, असे मत कायदेतज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केल आहे.
वृत्तसंस्थाच्या महितीनुसार,राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच महत्त्वाचा नाही तर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी ही मार्गदर्शक असाच ठरणारा असणार आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख सर्वोच्च न्यायालयाने अद्याप जाहीर केलेली नाही. या निकालावर राज्यातील सत्ताकारणाचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, राज्यातील सत्तासंघर्षवर 11 मे किंवा १२ मे रोजी रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट न्यायालयच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते, यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते.
एकनाथ शिंदे अपात्र झाले तर उरलेले आपोआप अपात्र होतात त्यामुळे सरकार कोसळेल. त्यांच्याकडे संख्याबळ राहणार नाही. कदाचित त्याआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतात,असे मोठे विधान असिम सरोदे यांनी केले आहे. हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते, अशी शक्यता असिम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS