आमदार नीलेश लंके | कृषी विभागाची खरीप हंगाम नियोजन आढावा सभा पारनेर | नगर सह्याद्री सध्या शेतकरी शेतीमालाला भाव नसल्याने व अवकाळी पावसामुळे...
आमदार नीलेश लंके | कृषी विभागाची खरीप हंगाम नियोजन आढावा सभा
पारनेर | नगर सह्याद्री
सध्या शेतकरी शेतीमालाला भाव नसल्याने व अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडला असून सरकारने शेतीमालाला हमीभाव द्यावा. तर दुसरीकडे शेतकरांनी पारंपरिक शेती ऐवजी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावे असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले आहे.
पारनेर पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन आढावा सभा सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार नीलेश लंके बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके म्हणाले की, शेतक-यांनी शेतक-यांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा व शेतमालावर प्रक्रिया करा जेणे करुन शेतक-यांना त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळेल व त्यांच्या शेतमालाला त्यांना किंमत ठरवता येईल तसेच शेतक-यांची मुल त्यांना रोजगार मिळेल असे आमदार लंके यांनी तालुयाच्या खरीप नियोजन आढावा सभेला उद्देशून सांगितले. तसेच कृषी विभागाने जास्तीत जास्त तालुयात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतात व त्यांनी शेतकर्यांपर्यंत सर्व योजना पोहचविले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगीतले.खरीप हंगाम नियोजन आढावा सभा २०२३-२४ मध्ये करण्यात आलेले नियोजन व मागील वर्षी झालेले कामे या बद्दल पी.पी.टी. व्दारे उपस्थितांना सविस्तर माहिती व महाडिबीटी अंतर्गत कृषि विभागाच्या विविध घटकातंर्गत बाबी वाटप केल्या. किती शेतक-यांना लाभ दिला याबद्दलही माहिती तालुका कृषि अधिकारी विलास गायकवाड यांनी सदर आढावा बैठकीत आमदार लंके व उपस्थितांना दिली.पंचायत समिती विभाग पारनेर यांच्या योजने बद्दल सविस्तर माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
तसेच पिक स्पर्धा यामध्ये क्रमांक आलेले शेतकरी तसेच प्रगतशील शेतकरी व चांगले काम केलेले अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला.आत्मा अंतर्गत खरीप २०२३ कृषि प्रात्यक्षिक मध्ये मटकी बियाने वाण आरएमओ २२५१ शेतक-यांना वाटप करण्यात आले. महाडिबीटी अंतर्गत ट्रॅटर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, हारव्हेस्टर ई लाभ मिळालेले शेतक-यांना आमदार लंके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कृषि विभागातील कृषि सेवक यांनी आपल्या मानधन वाढीसाठी आमदार लंके यांना निवदेन दिले.खरीप हंगाम नियोजन आढावा सभेला.
नायब तहसिलदार. सुभाष कदम, पारनेर, गट विकास अधिकारी किशोर माने, उपविभागीय कृषि अधिकारी नवले, तालुका कृषि अधिकारी विलास गायकवाड, तसेच शेतकरी व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते. सर्व शेतकरी व कर्मचारी यांना खरीप हंगाम २०२३ ला सामोरे जान्यासाठी शेतकरी बांधवांना त्यांच्या दैनंदिन कार्यास मदत मिळावी म्हणून अधिकारी वर्गाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व पारदर्शक सहकार्य द्यावे आसे सुचित करत आमदार लंके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS