पुणे। नगर सहयाद्री - पुण्यामधून एक अपघातची बातमी समोर अली आहे. कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात उंड्री चौकात अचानक एका व्हॅनिटी व्हॅनचे...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यामधून एक अपघातची बातमी समोर अली आहे. कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात उंड्री चौकात अचानक एका व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर या व्हॅनने ६ ते ७ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ ठार झाले आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एक व्हॅनिटी व्हॅन चालली होती. मात्र पुढे जात असताना या व्हॅनिटी व्हॅनचा अचानक ब्रेक फेल झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली आहे. अपघातात एक रिक्षा, टेम्पो, दोन कार, एक दुचाकी, एक चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
COMMENTS