मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम सध्या सुरु आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात काही दिवसांपूर्वी एका जम...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम सध्या सुरु आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात काही दिवसांपूर्वी एका जमावाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्र्यंबकेश्वर मंदिराचा हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नकली हिंदुत्वाच्या नावाने भजन करणाऱ्याचा दंगली घडवून राजकारणाचा डाव यशस्वी होणार नाही, असा खासदार संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम सुरु आहे. सत्तेत आलेले लोक अनैतिक मार्गाने सत्तेत आले आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा नाही. ही लोक नकली हिंदुत्वाच्या नावाने भजन करत आहेत. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला काही कट दिसतोय, आमचे हिंदुत्व कडवट आहे नकली नाही, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटलं की, मोदी आणि आम्ही स्वतः अजमेर दर्गा, हाजीअली, अशा दर्गांमध्ये जातो. हिंदु लोक दर्ग्यात जातात. याठिकाणी श्रद्धेने चादर चढवली जाते. त्र्यंबकेश्वर झालेला प्रकार निंदणीय आहे. सरकारच्या पायाखालची जमिन हादरली आहे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे.पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. बजरंग बलीची गदा मोदींनी फिरवली पण ती त्यांच्याच डोक्यात पडली. हिंदुत्व आमचा व्यवसाय नाही, राजकीय भांडवल नाही, श्रद्धा आहे. देशद्रोही कोण हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
COMMENTS