अहमदनगर | नगर सह्याद्री मध्यरात्रीच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक परिसरात धारधार सुरा घेऊन दहशत निर्माण करणार्या तरूणाला पकडण्यास गेलेल्या ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
मध्यरात्रीच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक परिसरात धारधार सुरा घेऊन दहशत निर्माण करणार्या तरूणाला पकडण्यास गेलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत बोरूडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैद जाकीर शेख (वय २८ रा. भारस्कर कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, त्यास अटक केली आहे. सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे यांचे पथक गस्त घालीत असताना त्यांना मध्यरात्री एकच्या सुमारास माळीवाडा बस स्थानक परिसरात गर्दी दिसली. तेथे शेख हातात धारधार सुरा घेऊन दहशत निर्माण करीत होता. त्याला पकडत असताना त्याने पोलिसांना विरोध करून कामात अडथळा निर्माण केला. उपनिरीक्षक दुर्गे यांनी पोलीस ठाण्यातून अधिक अंमलदारांना बोलून घेतले. ते आल्यानंतर पोलिसांनी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा हस्तगत केला आहे.
COMMENTS