मुंबई - ‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्यांमुळे तिला अनेक वेळा ट्रो...
मुंबई -
‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्यांमुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मीडियासोबत उर्फी कायम स्पष्ट आणि उघडपणे बोलते. नुकत्याच युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने अनेक खुलासे केले आहेत. यावेळी उर्फीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर जोरदार टीका करत त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने मुलाखतीदरम्यान, उर्फीला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबाबत प्रश्न केला. यावर उर्फी म्हणाली, “एक्स बॉयफ्रेंडमुळे असे काही अनुभव आलेत की, मी आता कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करणार नाही.” या मुलाने कसे फसवले याबाबत खुलासा करताना तिने सांगितले, “मी त्याच्या नावाचा टॅटू काढला होता, परंतु त्या मुलाने तुझ्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढतो असे सांगून मला फसवले. त्याच्या वडिलांच्या आणि माझ्या वाढदिवसाची तारीख एक असल्याने, हा वडिलांसाठी काढलेला टॅटू आहे असे त्याने सर्वांना सांगितले. आधी मी अशी वेडी होती, पण आता माझ्याकडे पैसे असल्याने मला कोणाचीही गरज नाही.”
एक्स बॉयफ्रेंड अशाप्रकारे फसवत असल्याचे कळल्यावर उर्फीने त्याच्या नावाचा टॅटू कव्हरअप केल्याचे सांगितले. पुढे ती म्हणाली, “टॅटू का कव्हर केलास म्हणून उलट एक्स बॉयफ्रेंडने मलाच जाब विचारला. त्यावेळी मी त्याला स्पष्ट सांगितले तुला हे रिलेशनशिप मान्य करायचे नाही मग मीच का सिंदूर आणि मंगळसूत्र घालून फिरु?” तसेच, या गोष्टीवरुन तिची आईसुद्धा “जा आता आणखी काही टॅटू काढ” असे बोलत तिची आजही खिल्ली उडवत असल्याचे उर्फीने मुलाखतीदरम्यान सांगितले.
दरम्यान, या मुलाखतीदरम्यान उर्फीने सर्व प्रश्नांची बिनधास्तपणे उत्तरे देत, एक्स बॉयफ्रेंडविषयी सांगताना अपशब्दांचा वापरही केला आहे. तसेच शेवटी आता मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून ‘मुव्ह ऑन’ झाल्याचेही उर्फीने आवर्जून नमूद केले.
COMMENTS