मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक नेत्यांकडू...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक नेत्यांकडून करण्यात आले आहे.११ ते १३मे च्या काळात भूकंप येणार आहे. भाजपाला व देवेंद्र फडणवीसांना अशा भूकंपाचा धक्का बसणार असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी केला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच पद जाणार,पदाची अदलाबदल होणार,अजित पवार मुख्यमंत्री होणार,अशा वेगवेगल्या चर्चेला उधाण आले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेवर अजून निकाल आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा भूकंप होणारअसल्याच्या चर्चाना वेग आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी एक नवा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
सूषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, ११ ते १३ मे च्या काळात भाजपाला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला, तरी आश्चर्य वाटू नये. एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणे, वेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत आहेत, त्यासाठी आटापिटा करत आहेत पण फडणवीसांच्या उठाठेवींमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत तर बाजारच उठला आहे. ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल.
COMMENTS