अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरात विशेषतः तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोल...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात विशेषतः तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या ६ जणांच्या टोळीकडून २४ मोटारसायकल सह २३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. या मोटारसायकल चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. या दरम्यान तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी मार्केटयार्ड परिसरामध्ये सापळा लावून एका इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात्याने त्याचे नाव मनोज गोरख मांजरे असे असल्याचे सांगितले व त्याच्या साथीदारासह मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे करण मनोज पवार, साहिल गफूर पठाण, योगेश सावळेराम मांजरे, उमेश दिलीप गायकवाड, शुभम अविनाश महांडुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ बुलेट, ८ एचएफ डीलस, ३ स्प्लेंडर, २ पॅशन प्रो, २ पल्सर, १ ऍसेस, १ शाईन अशा एकूण २४ विविध कंपनीच्या २३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केल्या आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, अविनाश वाघचौरे, धीरज खंडागळे, संदीप धामणे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सुरज वाबळे, सतीश त्रिभुवन, सतीश भोर, संदीप गिरे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, तसेच तांत्रिक विभाग अहमदनगर दक्षिण पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड व नितीन शिंदे यांनी केली आहे.
COMMENTS