मुंबई । नगर सह्याद्री - आरबीआयकडून (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे ग...
मुंबई । नगर सह्याद्री -
आरबीआयकडून (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली आहे .
मंगळवारपासून देशातील सर्व बँकांमध्ये २००० च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, "नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटांवर घातलेली बंदी ही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे, असा अजिबात समज करु नये."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "बँकांना दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा डेटा तयार करावा लागेल आणि नोटांचा सर्व तपशील बँका तयार करतील." तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्याची सुविधा ही सामान्यच असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे आणि बँकांमध्ये देखील पूर्ण तयारी करण्यात आली असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
COMMENTS