महाराष्ट्रात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नागपूर-पुणे महामार्गावर बसची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
दुसरी घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात दर्यापूर-अंजनगाव रस्त्यावर एका एसयूव्हीची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी घडलेला अपघात हा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील आहे. ही बस पुण्याहून बुलढाण्यातील मेहेकरकडे जात होती. दरम्यान, दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रकची बसला थेट धडक बसली. या धडकेमुळे बसमधील सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे, अमरावतीतील दर्यापूर-अंजनगाव रस्त्यावर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास एसयूव्ही कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. वृत्तानुसार, एसयूव्हीमध्ये प्रवास करणारे एकाच कुटुंबातील लोक एका कार्यक्रमात सहभागी होऊन दर्यापूरला परतत होते. दरम्यान, एसयूव्हीची ट्रकला धडक बसली. या धडकेत एसयूव्हीमधील पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींना दर्यापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
COMMENTS