वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या भगवान महावीर चषक क्रिकेट सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे प्रदान अहमदनगर | नगर सह्याद्री क्रीडा स्पर्धांचे आयोजन ...
वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या भगवान महावीर चषक क्रिकेट सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे प्रदान
अहमदनगर | नगर सह्याद्री
क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये युवकांनी खेळाकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. तरी युवकांनी मैदानी खेळाकडे जास्तीत जास्त वळावे. जेणेकरून आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. खेळाच्या माध्यमातून चांगले विचार अंगीकारले जात असून एकोपा निर्माण होतो. विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. राज्य सरकार विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहन देत असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडेही वळावे भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चांगल्या नियोजनामुळे ही स्पर्धा नक्कीच नावलौकिक मिळेल असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
वाडियापार्क येथे सुरू असलेल्या भगवान महावीर चषक क्रिकेट सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चे प्रदान करताना जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले समवेत मर्चंट बँकेचे चेअरमन अमित मुथा, संचालक संजय चोपडा, अनिल पोखरणा, किशोर मुनोत, मोहन बरमेचा विजय कोथिंबिरे,आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड,अनिल पोखरना,प्रफुल्ल मुथा,पारस शेटीया, राहुल शिंदे, सी.ए.अनिल गांधी डॉ.सचीन बोरा अजय गुगळे, भगवान महावीर चषक परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.
संजय चोपडा म्हणाले की,भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्याचे काम होत असते तसेच या माध्यमातून युवक क्रिकेट खेळाचा आनंद लुटत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जातो. वाडिया पार्क येथे भगवान महावीर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडत आहे. तरी नगरकरांनी ही स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यावा असे ते म्हणाले.
COMMENTS