सूरत। नगर सहयाद्री - १३ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दत्तक घेतलेल्या मुलीवर वडिल आणि भावासह अन्य...
सूरत। नगर सहयाद्री -
१३ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दत्तक घेतलेल्या मुलीवर वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अनाथ आश्रमातून सहा महिन्यांची असताना कुटूंबाने पीडित मुलीला दत्तक घेतले होते. घेतली होती. मात्र, जस जस तिचे वय वाढत गेले तसे तिच्या अनेकांच्या वाईट नजरा पडत गेल्या. वडिलासंह,काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून ते तिच्यावर जबरदस्ती करत होते.पीडित तरुणीला त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने याबाबत तक्रार केली.
हे प्रकरण गंभीर असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन आरोपीदेखील आहे. सगळ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. जे काही तथ्य समोर येतील त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल. तसंच, अल्पवयीन मुलीची मेडिकल चाचणीही करण्यात येईल.अशी माहिती सूरतचे एसीपी बी. एम. चौधरी यांनी दिली आहे.
COMMENTS