पारनेर | नगर सह्याद्री शिक्षण क्षेत्र असो किंवा अन्य क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात टीमवर्कला फार महत्त्व असून शिक्षकांनी चौकटी बाहेरील शिक्ष...
पारनेर | नगर सह्याद्री
शिक्षण क्षेत्र असो किंवा अन्य क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात टीमवर्कला फार महत्त्व असून शिक्षकांनी चौकटी बाहेरील शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन माजी सभापती राहुल झावरे पाटील यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मूल्यांकनात ग्रेड प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव यशाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सेवक वृंद, साफसफाई करणारा महिला वर्ग ते सुरक्षारक्षक अशा सर्वांना त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सदस्य राहुल झावरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. दिलीप ठुबे यांनी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन भारत देशामध्ये व महाराष्ट्रात जे उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
त्या यशाला माझा खरोखर मनापासून सलाम असे गौरवोद्गार राहुल झावरे पाटील यांनी यावेळेस व्यक्त केले.पुढे म्हणाले, आज औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आजचा विद्यार्थी हा केवळ गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडायला नको तर तो बहुगुणसंपन्न होऊन महाविद्यालयातून बाहेर पडायला हवा. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे व सर्व प्राध्यापक वृंदांचे त्यांनी विशेष कौतुक केले.प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर म्हणाले, हा आनंद उत्सव साजरा करत असताना मला विशेष आनंद होत आहे. कारण महाविद्यालयातील प्रत्येक घटकानी केलेले कष्ट हे लाख मोलाचे आहेत.
डॉ. दिलीप ठुबे म्हणाले, आम्ही नॅकला सामोरे जाताना प्रत्येक गोष्टीचे नियोजन प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग हे अतिशय व्यवस्थित करत गेलो आणि त्या प्लॅनिंगनुसार काम आणि कार्य करत गेलो हे कार्य करत असताना प्रत्येकाने तन-मन-धनाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी मेहनत घेतली त्यामुळेच हे उत्तुंग यश आम्ही प्राप्त करू शकलो.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ आहेर यांनी केले. आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. हरेश शेळके यांनी आभार मानले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर यांनी विशेष कौतुक केले.
COMMENTS