अहमदाबाद- गुजरातमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. ही घटना शनिवारी (१३ मे २०२३) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. कृ...
अहमदाबाद-
गुजरातमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. ही घटना शनिवारी (१३ मे २०२३) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा सागर तलावात दोन मुले पोहताना बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन मुलांनी तलावात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने सर्वांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, गुजरातच्या बोताड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कृष्णा सागर तलावात ही घटना घडली. दोन मुलं आपल्या आजोबांसोबत बोटाद तलाव पाहण्यासाठी पोहोचले होते. तलाव पाहत असताना या मुलांनी पोहण्याचा हट्ट धरला. आम्हाला तलावात जाऊ द्या, पोहू द्या असा आग्रह त्यांनी धरला. मुलांच्या हट्टामुळे आजोबांनी अखेर त्यांना पोहण्याची परवानगी दिली. पण किनाऱ्यावरच थांबा, लांब जाऊ नका, अशा सूचनाही आजोबांनी दिल्या.
तलावात अंघोळ करत असताना ही मुलं अचानक खोल पाण्यात गेले. त्यामुळे ही दोन्ही मुलं बुडू लागली. त्यांनी वाचवण्यासाठी धावा केला. हा तीन मुलांना बुडताना पाहून तलावावर असलेल्या तीन मुलांनी कसलाही विचार न करता या खोल पाण्यात उडी घेतली. या मुलांना वाचवण्यासाठी गेलेले ही तीन मुलेही बुडाली. पाचही मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ होत आहे.
COMMENTS