सैनिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व वर्धापन दिन साजरा पारनेर | नगर सह्याद्री जय जवान जय किसान हा आपला देशाचा लोकप्रिय नारा असून सैनिकां...
सैनिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व वर्धापन दिन साजरा
पारनेर | नगर सह्याद्री
जय जवान जय किसान हा आपला देशाचा लोकप्रिय नारा असून सैनिकांमध्ये देश व समाज बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे या पारनेर तालुका सैनिक संघटनेच्या माध्यमातून सैनिकांनी यापुढील काळात आदर्श गाव व शाळा महाविद्यालयातील आदर्श विद्यार्थी घडवावे असे आवाहन पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. तर दुसरीकडे देशप्रेम व राष्ट्रभक्ती काय आहे. हे सैनिकांनी समाजाला आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून द्यावे असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. यावेळी कॅप्टन वराळ साहेब, अंबादास तरटे मेजर, मेजर मारुती पोटघन, सुबेदार ठोकळ, हवालदार कचरू शिंदे यांच्यासह माजी सैनिक कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुका आजी- माजी सैनिक संघटने तर्फे १ मे ला पारनेर तालुका सैनिक संघटना वर्धापन दिवस मजदूर दिवस व महाराष्ट्र दिन समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी आण्णा हजारे यांनी सैनिकांना संबोधित करत ग्रामीण भागात क्रांती करण्याची ताकद तुमच्यात असल्याचा सल्ला हजारे यांनी दिला आहे. पारनेर तालुका आजी- माजी सैनिक संघटनेने सोमवार दिनांक ०१ मे २०२३ रोजी सैनिक समारंभ राळेगणसिद्धी येथे आयोजित केला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी पारनेर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष कारभारी पोटघन यांनी अण्णा हजारे यांचा सन्मान करत याा संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी प्रास्तविक कॅप्टन वराळ यांनी करून महाराष्ट्र दिन, कामगार दिवस तसेच संघटना स्थापन दिवस या विषयी सविस्तर अशी माहिती दिली.संघटनेचे मार्गदर्शक ले. कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त) यांनी तालुयातील सैनिक संघटना गाव पातळीवर खूप चांगली कामे करत असून पुढील कार्यक्रमा विषयी सर्वांना अवगत केले.पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपण, शाळा सुरू झाल्या की शालीय साहित्याचे वाटप, सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सफाई अभियान तसेच्शाळा व कॉलेज मध्ये मार्गदर्शन सेमिनार आयोजित करून विद्यार्थ्यांना सैनिकी सेवेसाठी प्रेरित करण्याची कामे करण्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करावी असे आवाहन केले.
पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी सैनिकांना संबोधित करतांना सांगितले की सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर ही आदर्श सैनिक असावे तसेच देश सेवेनंतर आदर्श गाव, आदर्श विध्यार्थी व आदर्श नागरिक बनविण्यासाठी निस्वार्थ समाज सेवा करावी असे प्रेरणादायी विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्राध्यापक संतोष तरटे यांनी सूत्र संचालन केले तर सुभेदार प्रकाश ठोकळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS