मुंबई | नगर सह्याद्री अभिनेत्री शेहेनाज गिल ही आपल्या ग्लॅमरस अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा ’किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच २२ एप...
मुंबई | नगर सह्याद्री
अभिनेत्री शेहेनाज गिल ही आपल्या ग्लॅमरस अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा ’किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच २२ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉस ऑफिसवर आपली फारशी चांगली जादू दाखवू शकला नाही. शेहेनाज गिल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्टाग्रामवर तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. ती आपल्या मादक अदांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिचं नुकतंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.
यावेळी तिनं ब्लॅक ड्रेसमध्ये आपल्या चाहत्यांना अक्षरक्ष: मोहात पाडलं होतं. तिच्या फोटोंनाही प्रचंड लाईस मिळतात. परंतु सध्या शेहेनाज गिल वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. शेहेनाज गिल आपल्या आईसोबत रिक्षातून प्रवास करताना दिसली आहे. तिचे हे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शेहेनाज गिलचा ’देसी वाईब्स विथ शेहेनाज गिल’ हा शो चर्चत आहे. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखल्या जाणार्या शेहेनाजला आज तमाम लोकप्रियता मिळाली आहे. ’बिग बॉस’ या शोमधून तिला भलतीच लोकप्रियता मिळाली होती.
त्यानंतर ती अनेक शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सध्या तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तिचा ’किसी का भाई किसी की जान’ हा सलमान खानसोबतचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळीकडेच क्रेझ होती. यावेळी मध्यरात्री तिनं आपल्या आईसोबत रिक्षामध्ये बसून प्रवास केला.
COMMENTS