मुंबई। नगर सहयाद्री - काल रात्री आपण सर्वांनीच मेट गाला’ या फॅशन जगतातील सर्वात मोठ्या शोचा झगमगाट पाहिला. यावेळी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींसह...
मुंबई। नगर सहयाद्री -
काल रात्री आपण सर्वांनीच मेट गाला’ या फॅशन जगतातील सर्वात मोठ्या शोचा झगमगाट पाहिला. यावेळी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटी मेट गालाच्या रेड कार्पेटवर अवतरले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच मेट गाला’च्या रेड कार्पेटवर झळकणार होती. जगातील सर्वात मोठ्या मेट गाला’ या फॅशन प्लॅटफॉर्मवर आलिया डेब्यू करणार असल्याची चर्चेसोबतच नताशा पूनावालाच्या फॅशनचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
नताशा पूनावाला नेहमीच आपल्या हटया फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा मेट गाला’ या फॅशन प्लॅटफॉर्मवरील कलरफुल ड्रेस नेटकर्यांना फारच आवडलेला दिसत आहे. अनेकवेळा नताशा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाली आहे. पण नताशा विचित्र कपडे घालणे काही सोडत नाही. पण यावेळी देखील तिचे जितके नेटकरी कौतुक करत आहेत, त्याहून अधिक तिला ट्रोल करीत आहेत. यावेळी नताशा मेट गाला’मध्ये सिल्व्हर गाऊनमध्ये दिसली. नताशाचा फ्युटर ड्रेस पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे. यावेळी नताशाने मानेपासून पायापर्यंत सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमुळे बरीच चर्चा होत आहे.
नताशाचा हा ड्रेस पाहून नेटकरी भरपूर कमेंट करत आहेत. एका युजर म्हणतो, नताशा, तू तुझ्या फॅशन सेन्सने आम्हाला दररोज आश्चर्यचकित करते. दुसर्या युजरने तिची फॅशन पाहून तिला थेट बॉलिवूडमध्येच काम करण्याचा सल्ला दिली. तर आणखी एक म्हणतो, ही मेट गाला गर्ल आहे. नताशाची विचित्र फॅशनपाहून अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत.
COMMENTS