नवी दिल्ली वृत्तसंस्था- राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. आई आणि भावाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घट...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. आई आणि भावाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. शांती बेगम आणि हनिफ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मयत तरुणीचा लहानपणीच बालविवाह करण्यात आला होता. सततच्या कुरबुरीने ती सासरी जाण्यास तयार नव्हती. मुलगी दुसऱ्या तरुणासोबत फोनवर बोलायची. तिला अनेकदा समजावले मात्र ती ऐकत नव्हती. संतापलेल्या आईने भावाच्या मदतीने डाव रचत तिची हत्या केली. त्यानंतर तरुणीची मृतदेह विहिरीत फेकून दिला.
तरुणीच्या कुटुंबीयांनी २६ एप्रिल रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर फिर्याद नोंद करत तपास सुरु केला. यानंतर २९ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी नातेवाईकांचीही चौकशी सुरु केली. चौकशीत मुलीचा भाऊ आणि आई दोघांच्या जबाबात तफावत होती. पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
COMMENTS