मुंबई। नगर सहयाद्री - बेळगाव दौऱ्यावरअसताना पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले आहे. मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. ...
बेळगाव दौऱ्यावरअसताना पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले आहे. मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी पुन्हा येईन…पुन्हा येईन…अशी घोषणा केल्या मुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?अशा चर्चाना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिंदे गटातल्या एकूण १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी पुढच्या १० दिवसांत निकाल लागणं अपेक्षित आहे. राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा थेट ठाकरे गटाकडूनच करण्यात आला आहे.
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना केलेलं सूचक विधान नव्या चर्चेला कारण ठरलं आहे.देवेंद्र फडणवीस गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंह मंदिराला अचानक भेट देवून देवाचे दर्शनही घेतले. यावेळी त्यांनी निट्टूर येथे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपले कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो.संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. असेही फडणवीस म्हणाल.
COMMENTS