नागपूर। नगर सहयाद्री - नागपूरमधून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. दोन मित्रांनी एकमेकांशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपूरमधून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. दोन मित्रांनी एकमेकांशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्याने नकार दिल्यामुळे त्याच्याशी बळजबरी संबंध प्रस्थापित करून डोक्यात दगड घालून खून केला. घनश्याम सिरसाम (शिवनी-मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर संदीप चंद्रभान गोडांगे (२३, खापरी, कोराडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, घनश्याम हा आपल्या उदरनिर्वाहासाठी खापरी गावातील एका गोठ्यात गायींचे दूध काढण्याच्या काम करत होता. खापरी गावामधील संदीप गोडांगे यांच्याशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर कधी मैत्रीत झाले हे समजलेच नाही. संदीपच्या संगतीने घनश्यामला कधी दारूचे व्यसन लागले समजले ही नाही. ते दोघेही नेहमी सोबत दारू प्यायचे. दोघेही एकमेकांशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होते.
बुधवारी रात्री दोघांनीही दारू ढोसली. त्यानंतर संदीपने घनश्यामला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. मात्र, त्याने नकार देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संदीपने त्याच्यावर अत्याचार करीत त्याचा खून केला. त्याचा नग्नावस्थेत मृतदेह गायीच्या गोठ्यात फेकला. सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. याप्रकरणी संदीपला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
COMMENTS